Harbour Railway Stunt | हार्बर रेल्वे मार्गावर स्टंटबाजी करणारे दोघे ताब्यात | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हार्बर रेल्वे मार्गावर स्टंटबाजी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिलीय. वडाळा लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केलीय. सोहेल खान आणि वसीम शेख अशी दोन्ही मुलांची नावं आहेत. नशेसाठी लागणारी व्हाईटनर घेण्यासाठी ते हार्बर मार्गावरुन मस्जिद बंदला जात असताना 8 मे रोजी त्यांनी स्टंटबाजी केली. त्यांच्या स्टंट करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं मस्जिद बंदर स्थानकातून रविवारी ताब्यात घेतलं.. पोलिसांनी पालकांना बोलावून त्यांच्यासमोर मुलांना पुन्हा असं कृत्य न करण्याची समज दिली.