मुंबई : ड्रंक अँड ड्राईव्हप्रकरणी पोलिसांचा दणका, मुंबईत 613 तर पुण्यात 1144 तळीरामांवर कारवाई

Continues below advertisement
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका असं हजारदा सांगूनही काहींनी स्वतःचा शहाणपणा केला...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी काल मोठं सेलिब्रेशन केलं. परंतु त्यात दारु पिऊऩ गाडी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. मुंबईत जवळपास 600 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.. ठाणे आणि कल्याणमधील संयुक्त कारवाईत 1 हजार 950 जणांना पकडलं तर पुण्यात 1 हजार 144 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली... तिकडे उपराजधानी नागपुरातही तळीरामांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. नागपूर पोलिसांनी 770 तळीरामांवर कारवाई करत, अनेक वाहनं जप्त केली आहेत. त्यामुळे सेलिब्रेशननंतर तळीरामांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram