मुंबई : पीएनबीच्या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्याने घोटाळा, प्राथमिक चौकशीतून माहिती उघड
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत झालेल्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएनबी बँकेच्या तीन विभागांमध्ये समन्वय नव्हता. त्यामुळेच हा घोटाळा करणं शक्य झालं, अशी माहिती तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
बँकेच्या मुख्य तीन विभागांमध्येच संवाद नसल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑडिटमध्येही या घोटाळ्याबाबत कधी माहिती समोर आली नाही. तपास यंत्रणा सरकारला या घोटाळ्याबाबत अहवाल देणार आहेत. त्यामुळे अंतर्गत विसंवादामुळे घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.