मुंबई : प्लॅस्टिक वापराचा दंड ५ हजारांवरुन थेट 200 वर
Continues below advertisement
येत्या आठवडय़ाअखेर लागू होत असलेल्या प्लास्टिकबंदीनंतरही विक्रेते किंवा ग्राहकांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर लागू होणारा दंड कमी करण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. सध्या कुणाकडे प्लॅस्टिकची पिशवी आढळली तर ५ हजारांचा दंड नियोजीत आहे. मात्र त्याऐवजी तो थेट २०० रुपये करावा असा महापालिकेचा विचार आहे. दंड वसुलीवेळी होणारे वाद टाळून प्लास्टिकचा वापर लोकांनीच टाळावा, हा यामागचा हेतू आहे.
Continues below advertisement