मुंबई : प्लास्टिकबंदीचा दुसरा दिवस, कारवाईदरम्यान अधिकारी आणि व्यावसायिकांमध्ये वाद
Continues below advertisement
मुंबईत आज प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईचा दुसरा दिवस आहे. मात्र, कारवाईदरम्यान महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत. ज्या दुकानदारांकडून दंडाची वसुली होत आहे त्यांच्या मनात प्लॅस्टिकबंदीबाबत संभ्रम आहे. त्यामुळे बंदीबाबत नेमकी माहिती न देता सरसकट कारवाईला विरोध होताना पाहायला मिळत आहे. कोणत्या प्लॅस्टिकवर बंदी आहे आणि कोणत्या नाही त्याबाबत पुरेशी महिती आपल्यापर्यंत पोहचली नसल्याचं दुकानदार सांगत आहेत.
Continues below advertisement