मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेनंतर यूवाय कंपनी ब्लॅकलिस्ट
घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले विमान हे यूवाय कंपनीचं आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार ही तिच कंपनी आहे. जी कंपनी मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर सेवा पुरवत होती. यापूर्वी याच कंपनीच्या हेलिकॉप्टरमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन वेळा अपघात झाला होता. लातूर, गडचिरोली आणि अलिबामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाले होते. ते हेलिकॉप्टर याच यूवाय कंपनीचे होते. या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारनं या यूवाय कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं आहे.