मुंबई : उडत्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट पती-पत्नीचं घरगुती भांडण
Continues below advertisement
विचार करा, विमानात तुम्ही हजारो फूट उंचीवर आहात.. अचानक तुमच्या आजूबाजूला भांडणाचे आवाज यायला लागले... काही वेळ तुम्ही त्याकडे कानाडोळा कराल, मात्र हे भांडण दोन पायलटमध्ये सुरु असेल तर? त्यातही ते वैमानिक पती-पत्नी असतील आणि कॉकपिटमध्ये आपल्या वैयक्तिक भांडणातून शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतील तर? लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानात असाच काहीसा प्रकार घडला आणि सुदैवाने मोठा विमान अपघात टळला.
Continues below advertisement