मुंबई | घाटकोपर-मानखुर्द मार्गावर उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला, जीवितहानी नाही
Continues below advertisement
मुंबईतल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर मुंबई महानगरपालिकेच्या उड्डाणपुलाचं काम सुरु असताना एक मोठा गर्डर कोसळल्याची घटना घडलीय. हा गर्डर दोन कार आणि एका दुचाकीवर पडल्यानं गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र, सुदैवानं यात कुठलिही जीवितहानी झालेली नाही. सुरुवातीला हा मेट्रोचा पिलर असल्याची माहिती मिळत होती. मात्र, हे काम मुंबई मनपाच्या उड्डाणपुलाचं असल्याचं समोर आलंय
Continues below advertisement