पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, तर पाईप गॅस 30 रुपयांनी महागला

Continues below advertisement
सरकारनं एका हातानं पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन रुपयांनी स्वस्त केले आणि लगेच दुसऱ्या हातानं तुमच्या खिशात हात घातला आहे. कारण आजपासून सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. पाईप गॅसच्या मासिक बिलामध्ये 30 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक युनिटमागे एक रुपया दर वाढला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पाईप गॅसचं कनेक्शन आहे. अशा ग्राहकांना पुढच्या महिन्यात जास्तीचं बिल येणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. अशा स्थिती केंद्रानं कर कमी करुन ग्राहकांना दोन रुपयांचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. पण लगेच आज सीएनजी आणि पाईप गॅसच्या किंमतीचा भडका उडाला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram