मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतुकदार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्यानं देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत तर डिझेलनं तब्बल सत्तरी ओलांडली आहे. तर मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८२ रुपये ३५ पैशांवर पोहोचलं आहे. त्यानंतर आता वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा अशी केली जात आहे. चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर प्रतिबॅरल १०५ डॉलर होते. आता ते ७४ डॉलर आहेत. म्हणजेच चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमीच आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली दिसते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram