मुंबई: मराठा आरक्षणाबाबत आयोगाने कामाची गती वाढवावी : हायकोर्ट

Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आयोगानं कामाची गती वाढवावी असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहे.
३१ जुलैपर्यंत माहीती गोळा करण्याचं काम पूर्ण करणार अशी ग्वाही त्यावर राज्य सरकरनं हायकोर्टाला दिलीय.
वर्षभर प्रलंबित असलेल्या मुद्यावर आणखी किती वेळ लागणार? असा सवाल हायकोर्टानं विचारला होता. याप्रकरणाची पुढील सुनावणी१४ ऑगस्टला होणार आहे.
आधीच हे प्रकरण गेल्या दिड वर्षांपासून आयोगाकडे पडून आहे, आणखी किती वेळ देणार? असा सवाल हायकोर्टानं केला.
मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram