मुंबई : भिडे गुरुजींच्या मुंबईतील व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली!

Continues below advertisement
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजींचं मुंबईतील नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या व्याख्यानाला परवानगी नाकारली.

मुंबईतील लालबाग येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भिडे गुरुजींचं 7 जानेवारीला म्हणजे येत्या रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गेल्या एक महिन्यापासून या व्याख्यानाची तयारी केली जात होती. जवळपास 5 हजार लोक उपस्थित राहतील, अशी व्यवस्थाही इथे करण्यात आली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram