मुंबई : पासपोर्टवर पत्ता कायम राहाणार, सरकारचं स्पष्टीकरण
तुमच्या पासपोर्टवरील पत्ता हा बदलणार नसल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलाय.
त्यामुळे आता यापुढेही पासपोर्ट तुम्ही अॅड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकणार आहात.
पासपोर्टवरील मागच्या पानावरून पत्ता काढून टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. मात्र या निर्णयाला चहूबाजूनं झालेल्या विरोधामुळे हा निर्णय मागे घेतल्याचं परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आलंय. तसंच दहावी उत्तीर्ण नसलेल्यांना नारंगी रंगाचा पासपोर्ट देण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.