मुंबई : मुंबई विमानतळावर 82 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक
Continues below advertisement
मुंबई आंतरराष्टीय विमानतळावर कस्टम विभागानं 82 लाख 34 हजारांचे अंमली पदार्थ पकडलेत. याप्रकरणी सुहैब मंकडा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. त्याच्याकडून 2212 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील मुंबई विमानतळावरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. सुहैब मंकडा एअर इंडियाच्या विमानातून रियाधवरून येत असल्याची माहिती अंमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाला होती. सुहेबनं आपल्या ब्रीफकेसमध्ये हे ड्रग्स लपवले होते. या प्रकरणात अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा हात असण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement