दक्षिण मुंबईतील पाणी टंचाई कधी संपणार?
दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली पाणीटंचाई संपण्याचं नाव घेत नाहीय. मंत्र्यांचे बंगले, नगरसेवकांचे फ्लॅट पाठोपाठ आता सर्वसामान्यांच्या घरातूनही पाणी गायब झालंय. परळच्या काळेवाडीतील एेक्यदर्शन सोसायटीत पाणी येत नसल्याने रहिवाशी वैतागले आहेत. फक्त 10 मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाणीही भरलं जात नाहीय. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. यासंदर्भात पालिकेत तक्रार केल्यास एक ते दोन दिवस त्रास कमी होतो. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैस थे होते. या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.