पालघर : काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपकडून पालघरच्या रणांगणात?

Continues below advertisement
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीला मोठं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर भाजपने हालचाली वाढवल्या आहेत. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

राजेंद्र गावित हे काँग्रेसचे नेते असून, आघाडी सरकारच्या काळात ते राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री होते.

पालघर पोटनिवडणुकीसाठी राजेंद्र गावित यांना आयात करण्याचा भाजपचा प्रयत्न असून, भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आज संध्याकाळीच राजेंद्र गावित हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram