मुंबई : शिष्यवृती मिळत नसल्यानं टाटा इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र
Continues below advertisement
शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावरून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये सुरु असलेलं विद्यार्थी आंदोलन आता तीव्र झालं आहे.
शिष्यवृत्ती मिळावी म्हणून, गेल्या नऊ दिवसांपासून इथले विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र, त्याची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई आणि तुळजापूरमधल्या संस्थेच्या महाविद्यालयामधलं कामकाज बंद पाडलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून या महाविद्यालयांमध्ये कोणतंही कामकाज झालेलं नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, फी वाढ रद्द करावी, संशोधक विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी अशा या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद आणि तुळजापूरमधल्या संस्थांमध्ये एकाच वेळी हे आंदोलन सुरु आहे.