
मुंबई : हिंदमाताजवळही मॅनहोल उघडं, 'झाकणचोरीं'समोर पालिका हतबल
Continues below advertisement
मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून ऐन पावसाळ्यात मुंबईतील अनेक मॅनहोल्स उघडी दिसत आहेत. मात्र या मॅनहोल्सची झाकणं चोरीला जात असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. माटुंग्यात फाईव्ह गार्डनजवळ मॅनहोलचं झाकण चोरीला गेल्याचा प्रकार काल उघडकीस आला, तर दुसरीकडे आज हिंदमाता ते सायन दरम्यान असलेल्या रस्त्यावरचे मॅनहोल रात्रीपासून उघडेच आहे. यामुळे दोन वाहनांचा अपघात झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement