मुंबई | कांदा मातीमोल भावानं खरेदी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
कांदा हा नेहमीच डोळ्यात पाणी आणतो..भाव पडले तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं, भाव वाढले तर सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागतो..पण कांद्याची खरेदी आणि विक्रीच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळतेय..नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून २ ते ३ रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी केली जातेय..मात्र तोच कांदा मुंबईत विकताना २४ ते ३० रुपये किलो दरानं विकला जातोय....व्यापाऱ्यांकडून मात्र याबाबत कांद्याच्या क्वालिटीचं कारण दिलं जातंय..