नवी दिल्ली | बँक, नवीन सिम आणि शाळेत प्रवेशासाठी आधार अनिवार्य नाही : सुप्रीम कोर्ट
आधारच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने मोठा निर्णय दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये तीन न्यायमूर्तींनी बहुमताने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला. सोबतच काही अटीही घातल्या आहेत. बँकिंग आणि मोबाईल सेवांसाठी आधार अनिवार्य नसेल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही सुप्रीम कोर्टाने निकाल वाचन करताना दिला.