मुंबई : इच्छामरणावर निर्णय होत नसल्याने वृद्ध दाम्पत्याचा एकमेकांच्या हत्येचं प्लॅनिंग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर राष्ट्रपतींनी 31 मार्चपर्यंत इच्छामरणाच्या अर्जावर निर्णय घेतला नाही तर माझ्या पतीला माझी गळा दाबून हत्या करण्याची मुभा आहे, असं म्हणत स्वत:च्याच हत्येचं प्लॅनिंग गिरगावच्या दाम्पत्यानं केलंय.
नारायण लवाटे आणि इरावती लवाटे असं या दोघांचं नाव आहे. या दोघांचही वय 80 पेक्षा जास्त आहे.
त्यांना मूलबाळ नाहीए. शिवाय जवळचे मोजकेच नातेवाईक सोडले तर आपलं म्हणणारं कुणी नाहीए.
नारायण लवाटे एसटीत सुपरवायजर होते, तर इरावती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्यात.
या दोघांनाही वाढत्या वयाप्रमाणं आपल्याला आजार जडून आपले हाल होतील, अशी भीती आहे.
तसंच जवळचं कुणी नसल्यानं शरीराला त्रास देण्यापेक्षा मरण पत्करण्याची त्यांची इच्छा आहे.
मात्र आता राष्ट्रपतींनी 2 महिन्यानंतरही इच्छामरणावर निर्णय न घेतल्यानं त्यांनी 31 मार्चनंतर आम्ही एकमेकांची हत्या करु असं म्हटलंय.