मुंबई: दादर स्टेशनवर कॉन्स्टेबलने वृद्ध दाम्पत्याला वाचवलं
Continues below advertisement
रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडू नका असं रेल्वेकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र तरीही याकडे प्रवासी दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालत असल्याचं वारंवार समोर आलंय. दादर रेल्वे स्थानकावर अशाच प्रकार रेल्वे रुळ ओलांडताना वृद्ध दाम्पत्य थोडक्यात बचावलं. रविवारी पंजाब मेल दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर थांबली असता या गाडीतून एक दाम्पत्य चुकीच्या बाजूने उतरलं. त्यानंतर या दाम्पत्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर चुकीच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न असफल ठरत होता. तेवढ्यात एक जलद लोकल आली मात्र रेल्वे पोलिस दलाच्या कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवत या दाम्पत्याला प्लॅटफॉर्मवर खेचून घेतलं. आणि मोठा अनर्थ टळला. या कॉन्टेबलने जीव धोक्यात घालून दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होतंय
Continues below advertisement