मुंबई : ओला-उबर चालकांचा संप, मनसेकडून ओला कंपनीच्या गाड्यांची तोडफोड
Continues below advertisement
ओला उबेर चालकांचं मुंबईतलं आंदोलन आज पेटताना दिसतंय. कारण चालकांच्या या आंदोलनाला मनसेनं पाठिंबा दिल्यानंतर आता मनसेकडून ओला गाड्यांची तोडफोड केल्याचंही समोर आलं आहे. संपातही काही ओला चालकांनी गाडी रस्त्यावर उतरवल्यानं ही गाडी फोडल्याचं बोललं जात आहे.
मनसे वाहतूक सेनाचे सचिव नितीन नांदगावकर यांनी ही तोडफोड केली. विविध मागण्यांसाठी मुंबई, पुण्यासह दिल्ली, बंगळुरु, हैदराबादेतले ओला उबरचे चालक काल मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.
त्यामुळे या संपाचा फटका देशातल्या प्रमुख शहरातल्या प्रवाशांना बसणार आहे.
कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ ओलाचालकांनी हा संप पुकारलाय.