मुंबई : फक्त 99 रुपयात विमान प्रवास, एअर एशियाची ऑफर
Continues below advertisement
तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये विमानानं प्रवास करणं शक्य होणार आहे.
एअर एशिया या कंपनीनं ग्राहकांसाठी ही ऑफर दिलीय.
पण त्यासाठी तुम्हाला एअरएशियाच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवरुन तिकीट बूक करावं लागेल.
आजपासून 21 जानेवारीपर्यंत तुम्ही एअर एशियाचं तिकीट बूक करु शकता.
15 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सोय उपलब्ध करुन देण्यात आलीय. नवी दिल्ली, पुणे, बंगळुरु, हैदराबाद, कोची, कोलकाता, रांची या सात शहरांमधून उड्डाण घेणाऱ्या विमानासाठी ही सोय आहे.
याशिवाय एअर एशिया'च्या विमानाने भारतातून निवडक 10 देशांमध्ये प्रवास करायचा असल्यास त्यावरही सूट मिळणार आहे. ऑकलंड, बाली, बँगकॉक, क्वाला लंपूर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनी या एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशात केवळ 1 हजार 499 रुपयांच्या बेस फेअरमध्ये प्रवास करता येणार आहे.