मुंबई : नॉनव्हेजसाठी वेगळं ताट, IIT मुंबईत हॉस्टेलाईट्सना आदेश
आयआयटी मुंबई सारख्या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत मांसाहारी विद्यार्थ्यांना दिलेल्या आदेशामुळे सर्वांचे कान टवकारले आहेत. तुम्हाला हॉस्टेलमध्ये नॉन व्हेजमध्ये खायचं असेल, तर मेसमधील मुख्य ताटांमध्ये जेवू नका, असा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.
हॉस्टेल क्रमांक 11 मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 जानेवारीला हॉस्टेलच्या खानावळीकडून एक ईमेल आला आहे. मांसाहारी भोजनासाठी वेगळी ताटं वापरण्याची विनंती यामध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही मुलांच्या तक्रारीनंतर हा नियम केला असल्याचं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.