मुंबई : भारतीय रेल्वेमधील भरपेट जेवण आता बंद होणार!

Continues below advertisement
रेल्वेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या जेवणामुळे होत असलेला तोटा कमी करण्यासाठी आता आयआरसीटीसीने भोजन कपातीचा निर्णय घेतला आहे. कॅगने रेल्वेतील जेवणाचा दर्जा आणि होणाऱ्या खर्चावर ताशेरे ओढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे यापुढे रेल्वेत पूर्ण जेवण अर्थात भाजी, पोळी, भात आणि गोड पदार्थांऐवजी राईस कॉम्बोची सुविधा मिळेल.

भारतीय माणसांचं सर्वसाधारण डाएट 750 ग्राम इतकं असतं, मात्र रेल्वेत 900 ग्राम जेवण पुरवण्यात येतं. रेल्वेत मिळणाऱ्या राईस प्लेटसाठी 112 रुपये आकारण्यात येतात, मात्र रेल्वेला त्यापोटी 150 रुपये खर्च येतो. हा तोटा कमी करण्यासाठी जेवणाचा दर्जा सुधारण्यासह पदार्थांमध्ये कपात होईल.

यापुढे रेल्वेत सूप, सँडविच, ब्रेडस्टिक आणि बटर असे पदार्थ मिळणार नाहीत. शताब्दी आणि राजधानी सारख्या गाड्यांमध्ये सुरुवातीला ही सेवा उपलब्ध करुन दिली जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram