मुंबई : सीएसएमटी स्थानकावर मध्यभागी पूलच नाही
मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...लाखो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात...मात्र या स्थानकावर मिडल ब्रीज नसल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. नाही म्हणायला एक ब्रीज स्टेशनच्या शेवटाला आहे, मात्र ४ नंबर प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशाला जर ६ नंबरचा प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर अख्खा प्लॅटफॉर्म चालून जावं लागतं, एकवेळेस आपण सर्वसामान्यांसाठी हे ही मान्य करू, मात्र लोकलमध्ये अपंगांचा डब्बाही मध्यावरच येत असल्यानं वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांचे मोठे हाल होतात...
यासाठी अनेक प्रवाशांनीही तक्रार केली आहे.
यासाठी अनेक प्रवाशांनीही तक्रार केली आहे.