मुंबई : एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांना दिलासा, भाडेवाढीला सहा महिन्यांची स्थगिती

Continues below advertisement
कारण एसी लोकलच्या भाडेवाढीला सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईकर सध्या सवलतीच्या दरात एसी लोकलचा प्रवास करत आहेत. प्रवाशांची मते जाणून घेतली असता तूर्तास भाडेवाढ करू नये अशी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे सहा महिने भाडेवाढ होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत देशातली पहिली एसी लोकल सुरु झाली आणि मुंबईकरांचा प्रवास गारेगार झाला. एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकिट जीएसटीसह 60 रुपये तर कमाल तिकिट 205 रुपये आहे. 25 जून पासून भाडेवाढ होणार होती, मात्र आता ही भाडेवाढ आणखी ६ महिन्यांसाठी टळली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram