मुंबई : अनधिकृत बंगल्याप्रकरणी सुभाष देशमुख एकाकी, भाजपची गुपचिळी
Continues below advertisement
सोलापुरातील वादग्रस्त बंगल्याच्या बांधकाम प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. मात्र दोषी आढळल्यास मंत्रीपदावरुन दूर होईन. तसंच बंगला बेकायदेशीर असल्यास स्वखर्चाने जमीनदोस्त करेन, अशी प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. मात्र यानंतर भाजपच्या एकाही नेत्याने देशमुखांची बाजू घेतलेली दिसली नाही. सर्वच नेते, मंत्री याप्रकरणी सायलेंट मोडवर गेल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement