ठाणे : 7 मोबाईल कंपन्यांच्या 177 कार्डमधून हेरगिरी, महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यावर आरोप
Continues below advertisement
मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) लीक प्रकरणी 7 मोठ्या टेलिकॉम कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात आल्या आहेत. ठाणे गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, 7 मोबाईल टेलिकॉम कंपन्यांच्या 177 मोबाईल नंबरचे सीडीआर प्रसिद्ध खासगी गुप्तहेर रंजनी पंडित आणि इतर आरोपींकडून जप्त केले आहेत. त्यामुळे या कंपन्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
व्होडाफोन, एअरटेल, एअरसेल, आयडिया, टाटा, जिओ आणि यूनिनॉर या 7 टेलिकॉम कंपन्यांच्या मोबाईल नंबरचे सीडीआर आरोपींनी पैसे देऊन खरेदी केले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्यांना माहिती असल्याशिवाय कोणत्याही मोबाईल नंबरचे सीडीआर म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड मिळू शकत नाही. त्यामुळे पोलिस आता टेलिकॉम कंपन्यांची चौकशी करणार आहे, जेणेकरुन सीडीआर कंपनीकडून चोरला गेला की या कंपन्यांमधीलच कुणी व्यक्ती या प्रकरणात सहभागी आहे.