मुंबई : नौदलाच्या आडमुठ्या धोरणावर नितीन गडकरी यांची सडकून टीका
Continues below advertisement
नौदलाच्या आडमुठ्या धोरणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सडकून टीका केली आहे. निमित्त होतं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उद्घाटनाचं. नौदलाने मरिन ड्राईव्हवर होणाऱ्या तरंगत्या हॉटेलवर आक्षेप घेतला. आता मलबार हिलमध्ये नौदलाने आक्षेप घ्यायचं काय कारण? पण आपल्याकडे एखादा निर्णय घेतला की त्याला विरोध करण्याची मानसिकता झाली आहे. त्यामुळे यापुढे तुमच्या कामांसाठी नौदलाकडे किंवा संरक्षण खात्याच्या लोकांकडे जाऊ नका, थेट आमच्याकडे या. सरकारचे मंत्री तुमचे प्रश्न सोडवतील असं गडकरींनी म्हटलं आहे.
Continues below advertisement