नवी दिल्ली : लवकरच मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे बांधणार, नितीन गडकरींची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. दिल्लीतील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. या एक्सप्रेस वेसाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल असही गडकरी म्हणालेत. त्याचबरोबर चंबळ एक्सप्रेस वे तयार करुन तो मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेला जोडणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं. या एक्सप्रेस वेमुळं मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील अनेक दुर्गम भाग जोडले जाणार आहेत. त्यामुळे या भागाचा मोठा विकास होईल असंही त्यांनी सांगितलं.