ABP News

मुंबई : विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड?, नितेश राणेंचा आरोप

Continues below advertisement
मुंबईतील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये घडलेल्या भीषण अग्नितांडवामागे विशाल कारिया आणि बाळा खोपडे हे मास्टरमाईंड आहेत का, असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मंगळवारी सकाळी बुकी विशाल कारियाला ताब्यात घेतलं.

विशाल कारियाच्या घराबाहेर 'मोजोस् बिस्त्रो'च्या मालकांच्या गाड्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे कमला मिल्स आग प्रकरणानंतर विशाल कारियाने कोणाकोणाला फोन केले, कोणाची भेट घेतली, हे समजण्यासाठी त्याची सीबीआय चौकशी करावी, तसंच त्याची नार्को टेस्टही करायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणेंनी हा सवाल उपस्थित केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram