मुंबई : 'मातोश्री'बाहेरचा परिसर फेरीवाल्यांनी व्यापून टाकू, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबईतल्या फेरीवाल्यांवरुन पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे कुटुंबीयांमध्ये नवा संघर्ष सुरु झाला. आमच्या घरासमोर फेरीवाले बसवाच मग मातोश्रीबाहेर कसे फेरीवाले उभे करायचे हे आम्हाला माहित आहे, अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. मुंबई महापालिकेनं फेरीवाला क्षेत्रासंबंधात नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नारायण राणे, राज ठाकरेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार आहेत. त्यामुळे मनसे आणि राणे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत.