मुंबई : पीएनबीने प्रकरण सार्वजनिक केल्याने देणं देऊ शकत नाही : नीरव मोदी
Continues below advertisement
पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी कर्ज घोटाळ्यात पहिल्यांदाच नीरव मोदीने मौन सोडलं आहे. हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे पीएनबीने कर्ज वसुलीचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने पत्र लिहून म्हटलं आहे. देशातला सर्वात मोठा कर्ज घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीने उलट्या बोंबा ठोकणं सुरु केलं आहे.
पीएनबीने आपल्या कंपन्यांवर असलेलं कर्ज वाढवून सांगितलं असल्याचा दावाही नीरव मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16 फेब्रुवारीला पत्र लिहिण्यात आलं. आपल्या कंपन्यांवर पीएनबीचं कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे.