VIDEO | निरंकारी फाऊंडेशनकडून देशभरात स्वच्छता अभियान | मुंबई | एबीपी माझा
निरंकारी फाऊंडेशनकडून संपूर्ण भारतात आज स्वच्छता अभियान राबवण्यात येतंय. त्याअंतर्गत सरकारी रुग्णालयांची स्वच्छता प्रामुख्यानं करण्यात आली. बाबा हरदेवसिंग यांच्या 65 व्या जयंतीनिमित्त हे अभियान राबवण्यात आलं... निरंकारी फाऊंडेशनकडून आज देशातल्या 350 शहरांमधील 765 पेक्षा अधिक रुग्णालयं साफ करण्यात आली. त्यात मुंबईतल्या केईएम, जेजे, लोकमान्य टिळक, राजावाडी या रुग्णालयांना स्वच्छ करण्यात आलं. या अभियानात 3 लाखांहून अधिक अनुयायी यात सहभागी झाले होते.