मुंबई : शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्स 36 हजारांवर

Continues below advertisement
सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजाराची घौडदौड सुरुच आहे.. बाजार उघडताच सेन्सेक्स 36000 वर पोहोचला.. तर निफ्टीनंही ११ हजाराचा अंक पार केलाय.. सोमवारीसुद्धा शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्सनं नवा रेकॉर्ड केला आहे. बाजार खुलताच क्षणी सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला होता, तर निफ्टीनंही 10910 या नव्या आकड्याला गवसणी घातली होती.. जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण, आगामी अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा, परकीय, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध आस्थापनांकडून आगामी काळामध्ये जाहीर होणारे निकाल यामुळे शेअर बाजार तेजीत असल्य़ाचं जाणकारांचं मत आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram