मुंबई : डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही, पासपोर्ट जप्तीचे हायकोर्टाचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2018 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यात आली. डीएसकेंनी हायकोर्टाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं, अशा शब्दात हायकोर्टाने संताप व्यक्त केला. अंतिम निर्णय जरी 22 फेब्रुवारीला होणार असेल, तर डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आम्ही आज दूर करतो, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं.
डीएसके हायकोर्टात हजर होते, तेव्हाच आम्ही जामीन अर्ज रद्द केला असता, पण तेव्हाही आशेचा एक किरण होता, असं हायकोर्टाने सांगितलं.
डीएसकेंचे पासपोर्ट जमा करा अशा सूचना हायकोर्टाने सर्व विमानतळांना तातडीनं देण्याचे आदेश दिले. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यावर, कशावरुन डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.