VIDEO | स्विगी, झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉईजना परवाना बंधनकारक | एबीपी माझा

Continues below advertisement
स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांवर आता एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध सुरक्षा प्रशासन आता करडी नजर ठेवणार आहे. स्विगी, झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉईजना आता परवाना घेणं बंधनकारक असणार आहे.
त्यामुळे यापुढे तुम्ही अशा वेबसाईट्सवरून फूड ऑर्डर करणार असाल, तर डिलीव्हरी बॉईजकडे परवाना आहे का, याची खातरजमा करून घ्या.
डिलीव्हरी बॉईज अस्वच्छ खाणं किंवा खाणं गैररित्या हाताळत असल्याचं काही व्हायरल व्हीडिओजमधून समोर आलं होतं, मात्र अशा लोकांवर कारवाईसाठी एफडीएकडे माहिती नसायची. आता मात्र परवाना बंधनकारक असल्यानं कारवाईसाठी एफडीएकडे डिलीव्हरी बॉईजची माहिती असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram