मुंबई : राणीच्या बागेतील पेंग्विनकडे गुड न्यूज, मादी पेंग्विनने अंडं दिलं
Continues below advertisement
मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विन्सच्या कुटुंबात गोड बातमी आहे. भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मादी पेंग्विनने अंडं दिलं. त्यामुळे लवकरच या कुटुंबात नवीन सदस्य जन्माला येणार आहे. राणीच्या बागेत पेंग्विनच्या तीन जोडीतील एका मादीने गुरुवारी अंडं दिलं. सर्वात कमी वयाचा असलेला पेंग्विन मिस्टर मॉल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (साडेचार वर्षे) यांच्याकडे ही गुड न्यूज आहे. फक्त मुंबईतच नाही, तर देशभरात जन्माला येणारा हा पहिलाच पेंग्विन असेल. पेंग्विनच्या जन्मासाठी आणखी 40 दिवस वाट पाहावी लागणार आहे.
Continues below advertisement