मुंबई | नेहा धुपियाच्या डोहाळे जेवणाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी
अभिनेत्री नेहा धुपियाच्या डोहाळे जेवणाचा सोहळा काल मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 37 वर्षीय नेहा धुपियाने याच वर्षी मे महिन्यात 35 वर्षाच्या अंगद बेदीसोबत लग्न केलं. लग्नाच्या तीनच महिन्यानंतर चाहत्यांना गोड बातमी देत तीनं आपण प्रेगनेंट असल्याचं जाहीर केलं होतं.