मुंबई : अन् आकाशने आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!
Continues below advertisement
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती मुकेश आणि नीता अंबानींचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहताच्या साखरपुड्याची. शनिवारी या साखरपुड्याच्या सेलिब्रेशनसाठी दिग्गजांनी हजेरी लावली. मीडियासमोर नीता अंबानी आकाश आणि श्लोकासोबत आल्या. त्यावेळी ईशा आणि अनंतही सोबत होते. मीडियाला आकाश आणि श्लोकाचा सेपरेट कपल फोटो हवा होता. पण नीता अंबानी काही केल्या आपल्या लेकाचा हात सोडायला कबूल नव्हत्या. आकाश बाजूला झाल्यावर त्यांनी आपल्या सुनेचाच हात गच्च पकडून ठेवला. एकीकडे मीडियाचं फोटोसाठी बोलावणं आणि दुसरीकडे आईचा कपल फोटोसाठी नकार. काय करावं आकाशला काही कळेना. मग आकाशने सरळ आईचा हात बाजूला सारला आणि श्लोकासोबत पोझ दिली. या दृश्यांची सध्या जोरदार चर्चा आहे
Continues below advertisement