मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डावखरे यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत डावखरे हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पुढे 1987 साली ते ठाण्याचे महापौरही झाले.