NCP Protest | प्रकाश मेहतांच्या घरासमोर 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस'चं आंदोलन | मुंबई | ABP Majha
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय. एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी झालेले आरोप आणि लोकायुक्तांनी ठेवलेल्या ठपक्यानंतर राष्ट्रवादीनं आज त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मेहता यांच्या मलबार हिलमधील निवासस्थानाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय.