मुंबई : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालयासमोर भोपळे फोडून आंदोलन
Continues below advertisement
सरकारी नोकरभरतीच्या विरोधात मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भोपळा फोडो आंदोलन केलं. सरकारची नोकर भरतीची घोषणा ही निव्वळ फसवणूक असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी मंत्रालयाच्या दारात कार्यकर्त्यांकडून भोपळे फोडण्यात आले. फडणवीस नव्हे तर हे फसवणीस सरकार असल्याची घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्य़ांना ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement