मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

Continues below advertisement
दररोज होणाऱ्या इंधनदरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आक्रोश रॅली काढण्यात येत आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक चक्क बैलगाडीवर स्वार झाले होते. यावेळी मलिक यांनी सरकारवर टीकेचा आसूड ओढला. या आंदोलनाचा आणखी एक भाग म्हणून दुचाकीची प्रेतयात्रा काढण्यात आली आणि वाहनांची शोकसभाही भरवण्यात आली. दरम्यान, आज पेट्रोल एक पैशांनी स्वस्त झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर साखर वाटून सरकराचा निषेधही केला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram