मुंबई : भाजपने 40 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
राष्ट्रवादी पक्षानेच सत्ताधारी भाजप पक्षावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. राज्यातल्या 307 सिंचन प्रकल्पांना 40 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पांची किंमत वाढवणे हा घोटाळा नाही का? असा सवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला आहे.आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते.