गिरीश महाजनांना अटक करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी : नवाब मलिक
जळगावात नरभक्षक बिबट्याच्या शोधमोहिमेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही सहभागी झाले होते. यावेळी महाजनांच्या हाती चक्क बंदूक पाहायला मिळाली. याचवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.