मुंबई/नाशिक : भुजबळांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण, नाशिकमधील परिस्थितीचा आढावा

Continues below advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तुरुंग अधीक्षकांनी केईएम रुग्णालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून अटकेत होते.

हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कागदोपत्री सुटका बाकी होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भुजबळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते आता डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

भुजबळांची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया

''केईएमचे डॉक्टर्स उत्तम उपचार देत आहेत. कुटुंबीयांशी चर्चा करुन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घरी जाण्याचा निर्णय घेऊ,'' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram