मुंबई : नारायण राणे राज्यसभेवर जाण्यास अनुकूल, 12 मार्चला उमेदवारी अर्ज भरणार

Continues below advertisement
''राज्यसभेवर जाण्याचा निर्णय माझ्यासाठी एक संधी म्हणून पाहतो. त्याबद्दल भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. दिल्लीला जाण्याने कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, कारण ते माझे कार्यकर्ते आहेत,'' असं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी स्वतः स्पष्ट केलं.

राज्यसभेसाठी 12 मार्च रोजी अर्ज भरणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली. ''मी दिल्लीला चाललोय, पाकिस्तानला नाही, असं म्हणत कार्यकर्ते नाराज होणार नाहीत,'' असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपच्या चिन्हावर राज्यसभेवर जाणार का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही राणेंनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram